मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट आगामी राजकारणांवर प्रभाव टाकणारी

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांची मातोश्री येथे एन आर सी च्या विरोधातील आंदोलनावर चर्चा करण्यासाठी  भेट झाली. ही भेट  आगामी काळातील महाराष्ट्राच्या राजकारण व समाजकारणावर प्रभाव टाकणारी  ठरेल असे राजकीय जाणकारांचे मत आहे.  


वचिंत बहुजन आघाडीने लोकसभा व विधानसभा निवडणुक स्वबळावर लढवली होती. त्यामध्ये त्यांनी भरमसाठ मते घेत विविध राजकीय पक्षांची राजकीय गणिते बिघडवली होती.  त्यामुळे प्रकाश आंबेडकरांचे महाराष्ट्रातील राजकीय स्थान बळकट झाले आहे. तर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कॉग्रेस व राष्ट्रवादी कॉग्रेसला बरोबर घेवुन स्वता मुख्यमंत्री म्हणुन कार्यभार स्वीकारला आहे.


हिंदुत्ववादी व जहाल म्हणुन शिवसेना ओळखली जाते. मुख्यंमत्री उद्धव ठाकरे हेही त्याप्रमाणेच राज्यकारभार करतील असे वाटत होते. किमान समान कार्यक्रमांवर महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आल्यांने मुख्यंमत्री सर्वसमावेशक व धर्मनिरपेक्ष तत्वावर भर देत आहेेे


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व प्रकाश आंबेडकर  एकमेकाच्या जवळ येवु शकतात आणि त्यामधुन महाराष्ट्रात नविन सामाजिक व राजकीय समीकरणे जुळुन येवु शकतील. किंवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अशा भेटींमधुन आपले राजकीय विरोधक कमी करुन सरकारचे अडथळेही कमी करण्यातही यशस्वी ठरतील असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.