डॉक्टरांच्या विरोधातील मंचरचे सरपंच दत्ता गांजाळे यांचे उपोषण मागे.

आंबेगाव तालुक्यातील काही खाजगी डॉक्ट्रर रुग्णांचे चुकीचे निदान करुन  आर्थिक पिळवणुक करत आहेत. त्यांच्यावर कारवाई करा. या मागणीसाठी मंचर येथे ग्रामस्थांच्या वतीने  आमरण उपोषणाला बसलेले मंचरचे सरपंच दत्ता गांजाळे यांनी प्रशासनाच्या लेखी आश्वासना नंतर शिवसेना उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते लिंबु पाणी घेवुन उपोषण मागे घेतले.


परंतु प्रशासनाने दिलेले आश्वासन पुर्ण न केल्यास लुट करणार्या हॉस्पीटल समोर 26 जानेवारी पासुन पुन्हा ठिय्या आंदोलन केले जाईल. तसेच  मंचर व  आंबेगाव तालुक्यातील जनतेला योग्य दरात चांगली सेवा आणि आरोग्य सेवेतील गैरकृत्य रोखण्यासाठी मंचर ग्रामस्थासह  लढा सुरुच ठेवण्याचा निर्धार सरपंच दत्ता गांजाळे यांनी व्यक्त केला आहे.        


मंचर शहरामध्ये गेल्या काही महीन्यांमध्ये डेंग्यु रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामध्ये काही डॉक्टरांनी चुकीचे निदान करुन रुग्णांची लुट केली  आहे. हॉस्पीटलमध्ये दरपत्रक लावले जात नाही.  आदी मागण्यांसाठी 25 डिसेबंर पासुन मंचरचे सरपंच दत्ता गांजाळे आणि नवनाथ थोरात यांनी  आमरण उपोषण सुरु केले होते.


तहसिलदार रमा जोशी, गटविकास अधिकारी पठारे, आंबेगाव तालुका आरोग्य अधिकारी एस एस ढेकळे यांनी सदर तक्रार असणार्या डॉक्टरांची चौकशी करण्यासाठी पाच सदस्यीय शासकीय कमीटी गठीत  करुन त्याचा अहवाल मा.जिल्हाधिकारी यांना सादर केला जाईल . त्या समीतीच्या  चौकशीत दोषी आढळणार्या डॉक्टरांवर कारवाई करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले.


त्यामुळे शासकीय अधिकार्याची विनंती मान्य करत सरपंच दत्ता गांजाळे यांनी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते लिंबुपाणी घेवुन उपोषण सोडले. त्यांनतर मंचर ग्रामपंचायतीमध्ये ग्रामस्थ डॉक्टर व अधिकारी यांच्यामध्ये चर्चा होवुन हा प्रश्न सोडवण्याची हमी डॉक्टरांकडुन  अध्यक्ष सुनिल खिवंसरा यांनी दिली. यावेळी चर्चेत मा. शिवाजीराव आढळराव पाटील, सरपंच दत्ता गांजाळे माजी सरपंच बाळासाहेब बाणखेले, माजी उपसरपंच सुनिल बाणखेले, वसंत बाणखेले ,शांतता कमीटी अध्यक्ष युवराज बाणखेले,संतोष गावडे, डॉ सिमा खिवंसरा, महामुनी आदींनी सहभाग घेतलाा सर्व ग्रामपंचायत सदस्य,डॉक्टर, व ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.


एकंदरीत आंबेगाव तालुक्यातील काही खाजगी डॉक्टरांच्या विरोधातील उपोषण आज संपले असले तरी आगामी काळातही नागरीकांना चांगली सेवा देण्यासाठी आणि आरोग्य सेवेतील गैरकृत्य रोखण्यासाठी हा लढा मंचर ग्रामस्थांसह  सुरुच ठेवण्याचा निर्धार सरपंच दत्ता गांजाळे यांनी वास्तव टीमशी बोलताना व्यक्त केला आहे.