पुणे जिल्ह्याच्या विकासासाठी माजी खासदार शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांना मंत्री करा. अशी विनंती करणारे पत्र पुणे जिल्हा युवासेनेचे प्रमुख बापुसाहेब शिंदे यांनी स्वताच्या रक्तांने लिहुन शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे.
लोकसभा निवडणुकीत शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव झाला. त्यांनतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत मंत्री विजय शिवतारे,आमदार सुरेश गोरे, आ.शरद सोनवणे यांचाही पराभव झाला आहे. त्यामुळे खा. श्रीरंग बारणे वगळता शिवसेनेकडे खासदार व आमदार नाही. त्यामुळे आगामी काळात शिवसेनेला पुणे जिल्ह्यात संजीवनी देण्यासाठी मंत्रीपद दिले जाईल अशी अपेक्षा होती.
शिवसेनेच्या संभाव्य यादीमध्ये पुणे जिल्ह्यातील एकही नाव नाही. खेड लोकसभा मतदार संघाचे एकदा व दोनवेळा शिरुर लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करणारे शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांना मंत्रीपद मिळेल अशी शिवसैनिकांना अपेक्षा होती.
शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पंधरा वर्षे राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षांच्या बालेकिल्ल्यात त्यांना कडवे आव्हान दिले आहे. तसेच आता महाआघाडी झाल्याने पुणे जिल्ह्यात शिवसेना टिकवणे कठीण आहे. महाआघाडीत शिवसेनेचे आमदार नसल्यांने कॉग्रेस व राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचेच वर्चस्व राहणार आहे. त्यामुळे शिवसेनेला कार्यकर्ते सांभाळणे अवघड आहे. शिवाय भाजपाकडुन शिवसेना पदाधिकार्यांना आपल्या पक्षात प्रवेश देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
या पार्श्वभुमीवर माजी खासदार आढळराव पाटील यांना विधानपरिषदेवर घेवुन मंत्री करा. अशी मागणी युवासेना पुणे जिल्हा युवा अधिकारी बापुसाहेब शिंदे यांनी स्वताच्या रक्तांने पत्र लिहुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे.