महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्ष टिकणार - कामगार मंत्री ना. दिलीपराव वळसे पाटील

मागील पाच वर्षात भाजपा सरकारने  कामगारांच्या विरोधात निर्णय घेतले आहे. त्यामुळे कामगांराचा रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे.  कामगारांना किमान वेतन दिले जात नाही, अनेक कामगार कत्रांटी आहेत त्यांना कायम करणे गरजेचे आहे. या बाबत सरकारच्या वतीने  कामगारांना दिलासा देणारे निर्णय  घेतले जातील  असे प्रतिपादन  कामगार व उत्पादन शुल्क मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांनी मंचर येथे बोलताना व्यक्त  केले. तर त्यांनी महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्ष टिकणार असल्याचा विश्वास माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.


     मंचर ता आंबेगाव जि पुणे येथे मतदार संघातील मतदारांच्या वतीने आज नवनियुक्त  कामगार व उत्पादन शुल्कमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.


माजी आमदार पोपटराव गावडे,सुर्यकात पलांडे, कृषी उत्पन्न  बाजार समीती सभापती देवदत्त निकम,जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील,सभापती संजय गवारी,उपसभापती संतोष भोर,युवक राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष निलेश थोरात,माजी उप सभापती नंदकुमार सोनावले,कॉग्रेस आयचे तालुका अध्यक्ष राजु इनामदार,मानसिंग पाचुंदकर,प्रकाश पवार,बाळासाहेब बेंडे, राष्ट्रवादी कॉग्रेसचे तालुकाअध्यक्ष  विष्णुकांका हिंगे,वसंतराव भालेराव  जिल्हा परिषद सदस्य सुनिता गावडे,सविता बगाटे, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सत्काराला उत्तर देताना वळसे पाटील यांनी सर्व मतदारांचे आभार व्यक्त केले.


महाविकास आघाडीच्या वतीने दोन लाख रुपयापर्यंतचे कर्ज माफ करण्या आले असुन आगामी काळात नियमित कर्ज भरणार्या शेतकर्यांचीही कर्जमाफी करण्यात येईल असे आश्वासन वळसे पाटील यांनी दिले.तसेच महाविकास आघाडीत भिन्न विचारांचे पक्ष एकत्र आल्याने थोडे जुळवुन घ्यायला उशीर लागतो आहे.परंतु महाविकास आघाडीचे सरकार  पाच वर्ष टिकेल असा विश्वासही ना.वळसे पाटील यांनी व्यक्त केला आहे