पहिल्या जागतिक मेरीटाईम इंडिया परिषदेचे मुंबईत थाटात उद्घाटन.
मुंबई (प्रतिनिधी) : भारताच्या विस्तीर्ण 14,500 कि.मी. लांबीच्या समुद्रकिनारपट्टीला विकसित करुन देशाच्या इतिहासाला साजेसा सागरी व्यापार विकसित करण्यासाठी देशाने 'सागरमाळा' कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे भारतात सागरी प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करण्याची ही सर्वोत्तम वेळ असल्याचे आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज जागतिक समुदायाला केले. मुंबईतील गोरेगाव येथील बाम्बे कन्व्हेशन अन्ड एक्झिबिशन सेटर येथे आयोजित पहिल्या मेरीटाईम इंडिया परिषद-2016 उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
कोरिया हा देश सहयोगी आयोजक असणाऱ्या या तीन दिवसीय परिषदेत जगातील 40 देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. भारताच्या सागरी किनारपट्टीवरील विविध घटकांमध्ये असणाऱ्या गुंतवणुकीच्या संधीला जगापुढे आणण्यासाठी जहाज बांधणी मंत्रालयाने या जागतिक परिषदेचे मुंबईत आयोजन केले आहे. या परिषदेचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केले. यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी, कोरिया गणराज्याचे सागरी आणि मत्स्यपालन मंत्री किम योग-सुक, केंद्रीय जहाज बांधणी राज्यमंत्री पी.राधाकृष्णन, मेरीटाईम आंतरराष्ट्रीय संस्थेचे महासचिव कितँक लिम आदी उपस्थित होते.यावेळी प्रधानमंत्री म्हणाले, वार्षिक सकल उत्पन्नाचा (जीडीपी) दर 7 टक्क्यांवर ठेवणारा भारत हा जगातील गतीने वाढणारी आर्थिक सत्ता आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न हा देश आर्थिक व सामाजिकदृष्ट्या सक्षम बनविण्याचे होते, आम्ही त्याच दिशेने वाटचाल करीत आहोत. . ___ या परिषदेमध्ये 40 देशातील 4500 शिष्टमंडळ सहभागी झाल्याचे मला सांगण्यात आले. कोरियासारखा प्रगत देश यामध्ये सहयोगी देश म्हणून पुढे आला आहे. अशावेळी जागतिक समुदायाला मी आवर्जून सांगू शकतो की, जहाज बांधणी आणि बंदरे विकास क्षेत्रातील गेल्या दोन वर्षातील लक्षणीय प्रगतीचा आढावा आपल्यापुढे आहे. त्यामुळे भारतात समुद्रमार्गे गुंतवणूक करण्याची ही सर्वोत्तम वेळ आहे. आम्हाला आमच्या सागरी व्यापाराच्या हजारो वर्षाच्या वैभवशाली परंपरेला पुन्हा नव्याने जागतिक ख्यातीचे बनवायचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी भरुच, कोडुनगलुर, तुतीकोरिन, नागापट्टणम, आरियांकुप्पम आदी 2 हजार वर्षांपूर्वीच्या व्यापारी बंदराचा इतिहास नमूद केला. 'मेक इन इंडिया'च्या अंतर्गतच आजची मेरीटाईम इंडिया परिषद होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जगाने 'मेक इन इंडिया'ची दखल घेतल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. जागतिक बँकेने घेतलेली दखल, शेजारी राष्ट्रांशी वाढलेले व्यापारी संबंध, संरक्षण खात्यातील 60 टक्के निर्माण हे परवानाविरहीत करणे, थेट विदेशी गुंतवणुकीच्या प्रस्तावांना तत्काळ मिळणारी मान्यता, जहाज बांधणी क्षेत्रात सहाय्यभूत ठरणारे आर्थिक सहकार्य धोरण, सागरी करासंदर्भातील दूर केलेल्या अडचणी, रेल्वे व बंदरे यांच्या विकासासंदर्भात रेल्वेबंदर महामंडळाची उभारणी, राष्ट्रीय जलवाहतूक धोरणाबद्दल केलेले सुलभ कायदे आदी बदल त्यांनी लक्षात आणून दिले. ते म्हणाले, या बदलामुळे जहाज बांधणी आणि बंदरे विकासात लक्षवेधी विकास घडन आलेला आहे. प्रमुख बंदरातील व्यापारखद्धी आतापर्यंतच्या सर्व विक्रमांना मागे टाकणारी आहे. गेल्या दोन वर्षात या बंदरांनी 165 दशलक्ष टनाची विक्रमी क्षमता सिद्ध केली आहे. या बंदराच्या नियमित क्षमतेपेक्षा 94 दशलक्ष टनाची ही क्षमतावद्धी आहे. दोन वर्षात 4 टक्क्यांनी वाहतुकीत वाढ झाली असून नफ्याच्या रकमेत लक्षणीय वाढ झाली आहे. एकट्या 2015-16 वर्षात 6.7 अब्ज रुपयांचा हा नफा आहे. त्यामुळे या क्षेत्रात आम्हाला जागतिक समुदायाचे लक्ष वेधायचे असून सागरी मार्ग, बंदरे विकास, जहाज बांधणी आदी सर्व विकासाच्या प्रकल्पांना एकत्र बांधणारा आणि भारताच्या 14 हजार 500 कि.मी. विस्तीर्ण लांबीच्या सागरी किनारपट्टीचा व अंतर्गत नदी वाहतकीचा विचार करणारा सागरमाला हा महत्वाकांक्षी पथदर्शी प्रकल्प सुरु केला आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात गंतवणूक करण्याचे आवाहन प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी यावेळी केले. यावेळी या पहिल्या परिषदेला उपस्थित आंतरराष्ट्रीय मेरी टाईम संस्थेचे महासचिव किटॅक लिम, कोरीया रिपब्लिकचे सागरी आणि मासेमारी मंत्री कीम-यंग-सूक यांनीही संबोधित केले. कार्यक्रमाच्या पूर्वार्धात भारताच्या सागरी व्यापाराचा इतिहास आणि सद्यस्थिती दर्शविणारे सादरीकरण करण्यात आले. तर 'सागरमाला' या अहवालाचे विमोचन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.