पीककर्ज भरण्याबाबत पुणे जिल्ह्यातील शेतकरी सभ्रमावस्थेत.
रिजर्व बँकेने सर्व बँकेच्या कर्जाच्या हप्त्यांना स्थगीती दिल्याचे सांगितले आहे.तरीही पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत शेतकर्यांनी घेतलेले पीककर्ज शुन्य टक्के व्याजदराने पडण्यासाठी व नियमित कर्जफेड म्हणुन पन्नास हजार रुपये लाभ मिळावा यासाठी शेतकरी बँकेत गर्दी करत आहेत. कोरोनोचे संकट असतानाही शेतकरी गर्दीमध्ये कर्ज भरण्यासाठी रांगा लावुन आहेत. या कर्ज भरण्याबाबत पुणे जिल्हा बँकेचे संचालक अर्थमंत्री , उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भुमिका जाहीर करावी अशी मागणी शेतकरी करत आहेत.
पुणे जिल्ह्यात नियमित कर्ज भरणार्या शेतकर्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. सरकारने नियमित कर्ज फेडणार्या शेतकर्यांना सरकारने पन्नास हजार रुपये सवलत जाहीर केली आहे. तसेच 31 मार्च पुर्वी कर्ज भरल्यास शुन्य टक्के व्याजदर पडतो यासाठी शेतकरी बँकेत जावुन कर्ज भरण्यासाठी गर्दी करत आहे. कोरोनोच्या संकटामुळे संचारबंदी लागु आहे .तरीही शेतकरी पोलिसांचा मार खावुन , उसने कर्जाऊ पैसै घेवुन बँकेत जावुन रांगा लावत आहे.
याबाबत बँकेचे अधिकारी तुम्हाला 31 मार्चपुर्वीच कर्ज भरावे लागणार असल्याचे शेतकर्यांना सांगत आहे. आज रिजर्व बँकेने कर्जांबाबत भुमिका जाहीर करुनही पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक पीक कर्जाबाबत भुमिका जाहीर का करत नाही? असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.
या बाबत पुणे जिल्हा बँकेचे संचालक , अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी भुमिका जाहीर करावी अशी मागणी शेतकरी करत आहेत..