देशातील प्रत्येक जिल्ह्याचा सिंचन आराखडा तयार क केंद्रीय कृषी मंत्री..
ठाणे (प्रतिनिधी) : प्रधानमंत्री ग्राम सिंचन योजनेत गावकरी, लोकप्रतिनिधी तसेच संबंधित विभागांना एकत्र आणून प्रत्येक देशातील प्रत्येक जिल्ह्याचा सिंचन आराखडा तयार करण्याचे काम सुरु असून आत्तापर्यंत ३३५ जिल्ह्यांचे असे आराखडे तयार झाले आहेत. महाराष्ट्राने देखील यात पुढाकार घ्यावा जेणे करून खेड्यातील अगदी टोकापर्यंतच्या प्रत्येक शेतीला पाणी देता येईल, असे केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांनी सांगितले. LUMAN I TIVE देशातील अपूर्ण अवस्थेतील महत्त्वाच्या ८९ सिंचन योजना येत्या चार वर्षांत पूर्ण करण्यात येणार आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली. भिवंडी तालुक्यातील वेहेळे गावी लोढाधाम येथे आयोजित किसान ग्राम सभेत ते बोलत होते. ग्राम आणि कृषी विकासाची प्रत्येक योजनांची अंमलबजावणी झालीच पाहिजे यादृष्टीने अधिकाऱ्यांनी काळजी घेतली पाहिजे, असेही ते म्हणाले. या सभेस परिसरातील शेतकऱ्यांची चांगली उपस्थिती होती. कृषिमंत्र्यांनी यावेळी बोलताना राज्यातील विशेषत: लातूर परिसरातील भीषण पाणी टंचाईचा उल्लेख केला. लातूरच्या लोअर तेरणा पाणी प्रकल्पाचे अनेक वर्षांपासून रखडलेले काम अवघ्या काही दिवसात मार्गी लावून पाण्याची सोय केल्याबद्धल त्यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले. ते म्हणाले की, या वर्षभरात देशातील २३ सिंचन प्रकल्प पूर्ण होण्यासाठी २० हजार कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे. गावांना ८० लाख रुपये २१ ते २४ एप्रिल या कालावधीत ठिकठिकाणी होणाऱ्या ग्राम सभांना अवश्य उपस्थित राहून योजनांची माहिती करून घ्या, असे आवाहन करून कृषिमंत्र्यांनी सांगितले की, पंतप्रधानांनी प्रत्येक गावाला ८० लाख रुपये देण्याचे ठरविले आहे त्याचा योग्य विनियोग होईल हे पहा. शिवाय कृषी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्याकडून आपल्याशी संबंधित योजना पूर्ण समजावून घ्या. ई मंडीमुळे कृषी क्षेत्रात क्रांती पंतप्रधानांनी नुकतीच ई मंडी या अभिनव उपक्रमाची सुरुवात केली असून सध्या १२ राज्यातील ३६५ कृषी मंड्यांची माहिती आली
आहे. पुढील दोन वर्षांत ५८५ मोठ्या बाजारपेठा या संगणकाद्वारे जोडल्या जातील. महाराष्ट्रातील २-३ बाजारपेठांचा देखील पहिल्या टप्प्यात समावेश असून शेतकऱ्यांना जिथे चांगला भाव मिळेल तिथे आपले उत्पादन विकण्याची मुभा राहील आणि यात दलालांचा हस्तक्षेप राहणार नाही, असे त्यांनी टाळ्यांच्या सांगितले. पंतप्रधानांनी लक्ष घातल्याने कृषी क्षेत्रात बरेच महत्त्वाचे बदल होत आहे असे सांगून राधामोहन सिंह म्हणाले की, पूर्वी युरिया खताची खूप टंचाई असे पण ती कृत्रिम आहे हे लक्षात आल्याने पाऊले उचलण्यात आली आणि आज शेतकऱ्यांसाठी असलेल्या युरियाचा दुरुपयोग बंद झाला. शेतकऱ्यांसाठी किसान वाहिनी ही दूरदर्शनवरील वाहिनी एखाद्या मुक्त विद्यापीठाप्रमाणे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहे असे सांगून कृषिमंत्री म्हणाले की, शेतीतील नवे तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे. शेतीच्या जोडीनेच मोठ्या TIVE प्रमाणावर झाडे लागवड केली पाहिजे. भाजीपाला लागवड वाढविण्यासाठीही योजना अंमलात येणार आहे त्याचबरोबर पीक विमा योजना अधिक परिणामकारक आणि शेतकऱ्यांना फायदेशीर करण्यात आली आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. शेती किफायतशीर व्हावी आणि शेतकऱ्यांना आर्थिक फायदा व्हावा यादृष्टीने सरकारने पाऊले टाकली आहेत,असेही ते म्हणाले. शेतकऱ्यांशी संवाद याप्रसंगी कृषिमंत्र्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना त्यांच्या सूचना करण्याचे आवाहन केले. त्यानंतर शेतकरी विजय पाटील, किरण पाटील, गुरुनाथ सांबारे, रवींद्र जाधव, लक्षम कोष्ते, सुनीता चोंडे यांनी विविध सूचना केल्या. प्रारंभी खासदार कपील पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकात ठाणे जिल्ह्यातील आणि परिसरातील शेतकऱ्यांना मुंबईसारख्या महानगराच्या लागत असूनही विशेषत: भाजीपाला आणि दुग्धव्यवसाय यामध्ये प्रगती करता येत नाही त्याचप्रमाणे क्षमता असूनही शेतीला पुरेसे पाणी मिळत नाही, अशी खंत व्यक्त केली. __ याप्रसंगी कृषी खात्याच्या विविध योजनांच्या घडीपुस्तिकांचे प्रकाशन कृषिमंत्र्यांच्या हस्ते झाले तसेच जमीन आरोग्य पत्रिकांचे आणि पॉवर टिलरचे वाटप लाभार्थीना करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिल्हा परिषदेच्या अवजारे बँक दालनाचे उद्घाटनही कृषिमंत्र्यांनी केले. यावेळी जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील यांनी त्यांना माहिती दिली. याप्रसंगी आमदार किसान कथोरे, सरपंच गजानन दत्तू पाटील, कृषी आयुक्त विकास देशमुख, जिल्हा कृषी अधीक्षक महावीर जंगटे आदींची उपस्थिती होती.