मंचरच्या नागरीकांना आत्यावश्यक सेवा मिळणार घरपोच,

नागरीकानी घराबाहेर न पडण्याचे सरपंच दत्ता गांजाळे यांचे आवाहन.  


कोरोनो व्हायरसचा  राज्यात व देशात वाढता प्रभाव लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  राज्यात संचारबंदी लागु केली आहे. नागरीकांना घराबाहेर न पडता सहकार्य करण्याची विनंती केली आहे. तरीही बहुतेक नागरीक निष्काळजीपणे घराबाहेर पडत आहेत . आत्यावश्यक सेवेच्या नावाखाली रस्त्यावर दुकानामध्ये गर्दी केली जाते  आहे . यावर  मंचर ग्रामपंचायतीने नागरीकांना आत्यावश्यक सेवा घरपोच देण्याचे नियोजन केले आहे.


सरपंच दत्ता गांजाळे यांनी या नियोजनामध्ये सहभागी होऊन सहकार्य करण्याचे व घराबाहेर  न पडण्याचे  नागरीकांना आवाहन केले आहे.                            


कोरोनो सारख्या महाभयकंर  व्हायरसला रोखण्यासाठी जनतेने शासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे. त्यासाठी नागरीकांनी घराबाहेर न पडता  घरामध्ये थाबंण्याचे आवाहन प्रशासन वारंवार करत आहेत. तरीही किराणा, दुध,भाजीपाला ,औषधे  आदी घेण्यासाठी मंचर शहरात नागरीक प्रंचड गर्दी करत आहेत.


 यावर मंचर ग्रामपंचायतीने नागरीकांनी घराबाहेर न पडण्यासाठी नियोजन केले आहे. त्यासाठी किराणा, भाजीपाला,दुध, औषधे आदी  जीवनावश्यक वस्तु घरपोच दिल्या जाणार आहेत.


त्यासाठी सबंधित दुकानदार व त्यांची घरपोच सेवा देणारे कामगार  यांना पास दिले  आहेत. त्यामुळे नागरीकांनी घराबाहेर न पडता सबंधित  घरपोच सेवा देणार्या दुकानदाराकडेच आपली ऑर्डर द्यायची आहे.    


आत्यावश्यक सेवेच्या नावाखाली होणारी गर्दी पुर्णपणे थांबणार आहे. देशावर ओढवलेले कोरोनो व्हायरसचे संकट कमी करण्यास मदत होणार आहे.


 नागरीकांनी  नियोजना बाबत सहकार्य करण्याचे तर दुकानदारांनी रास्त व योग्य भावात चांगली घरपोच सेवा देण्याचे आवाहन सरपंच दत्ता गांजाळे यांनी केले आहे.******