मंचर शहरातील उपाययोजनांचा मा.खा.आढळराव पाटील यांच्याकडुन आढावा

मंचर  येथे नागरिकांच्या आरोग्य विषयक सोयी-सुविधा, जीवनावश्यक वस्तूंचा नियमित पुरवठा  कसा आहे. कोरोनो व्हायरस व संचार बंदी यांची माहिती घेवुन , प्रशासकीय यंत्रणांना  माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी  आवश्यक  सूचना देऊन  परिस्थितीचा आढावा घेतला.


 या वेळी भेटीदरम्यान सोशल डिस्टन्स बाबत नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेत स्वतःची व आपल्या परिवाराची काळजी  घ्यावी. आवश्यकता असल्यास जीवनावश्यक वस्तूंसाठी घराबाहेर पडावे अशा सुचना केल्या. जिल्हाधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकारी यांना संपर्क साधून नियमित धान्य व जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याबाबत ग्रामीण भागात दक्ष राहण्याच्या सूचना  आढळराव पाटील यांनी दिल्या.


मंचर ग्रामपंचायत व विविध सेवाभावी संघटना यांच्या सामााजिक  कार्याचे  कौतुक करुन त्यांच्या कार्याची माहीती घेतली.  यावेळी मंचरचे सरपंच दत्ता गांजाळे, माजी उपसरपंच सुनिल बाणखेले युवासेना उपजिल्हा युवा अधिकारी कल्पेश बाणखेले, भैरवनाथ पतसंस्थेचे संचालक सागर काजळे, मंचर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे, वैभव बाणखेले, आकाश मोरडे, महेश घोडके, गोटु शेटे, सचिन मोरडे, अक्षय चिखले, सुरज धरम यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.