देशभक्तीचा विषय निघाला की आपला ऊर अभिमानाने भरुन येतो. देशासाठी आपण बलीदानालाही तयार होतो. देशाबद्दल वाईट बोलणार्याल्या आणि वागणार्याला देशद्रोही ठरवुन त्याला त्याची जागा दाखवावुन देतो. मग कोरोनोने भारताला चौहोबाजुने घेरले असताना, देश संकटात आहे. त्याला वाचवायची जबाबदारी आपण स्वीकारायला पाहीजे ना.? . त्यासाठी आपण स्वत: घरात बसले पाहीजे आणि इतरानांही सक्तीने घरात बसवायला पाहीजे.परंतु आपण आपली देशभक्ती विसरुन स्वार्थी बनलोय , सरकारने घालुन दिलेले नियम आपण जाणीव पुर्वक मोडतोय, मौजमजा म्हणुन रस्त्यावर फिरतोय, शासनाच्या आदेशाची टिगंल टवाळी करतोय, शहरातुन कधीही गावाकडे न जाणारे आपण गावाकडे जावुन आपल्या गावालाही संकटात ओढतोय, यावरुन खरच आपण देशद्रोही झालो आहोत का?याचा विचार करण्याची वेऴ आत्ता आली आहे. . कोरोनो सारख्या महाभयकंर व्हायरसचे संकट आपल्या देशावर चाल करुन आले आहे. त्या संकटाला सामोरे जाण्यासाठी आपण सरकारने घालुन दिलेले नियम तंतोतत पाळणे गरजेचे आहे. त्यासाठी आपली देशभक्ती जागवुन देशासाठी शासनाबरोबर खंबीरपणे उभे राहायला पाहीजे. आपण मात्र ते करत नाही . कारण आपण अद्यापही भानावर आलेलो नाही.आपण खबरदारी न घेतल्यास महाभयकंर कोरोनो व्हायरस काही दिवसामध्ये आपल्या देशाला खावुन टाकेल. आपल्य देशाला नेस्तनाबुत करु शकेल एवढी त्याची ताकत आहे. कोरोनोरुपी संकटाला देश आणि राज्य धीराने सामोरे जाते आहे. तर आपण कोरोनोरुपी संकटाला देशावर आक्रमण करण्यासाठी हातभार लावत आहोत. . . . आपली महाकाय असणारी लोकसंख्या दाटीवाटीने झोपडपट्टीत राहते आहे. रेल्वे आणि बसमधुन एकमेकांना चिरडत दोन वेळच्या पोटाची खळगी भरायला आपण शहरातले जीवन जगत आहोत. ग्रामीण भागातील शेतकरी कर्जबाजारीपणा मुळे आत्महत्या करत आहेत. हे सत्य प्रत्येकाने मान्य करायलाच हवे. साध्या साध्या आजारावर उपाय करायला आपली रुग्णालये कमी पडत असल्याच्या बातम्या वाचतच आपण मोठे झालो आहोत. याचा विचार करा ? . . . कोरोनो व्हायरसचा संसर्ग देशात आणि राज्यात मोठ्या प्रमाणात वाढला तर त्याला थोपवणे आपणाला शक्य नाही. आपला देश वाचवण्यासाठी, आपले नातेवाईक, मित्र आपणा स्वत:ला वाचवायला भानावर या घरात बसा .शासनाला व प्रशासनाच्या आदेशाचे पालन करा. यामधुनच आपली देशभक्ती सिद्ध करा. एरवी सोशल मिडीयावर देशप्रेमाचे डोस पाजण्यात मग्न असणारे आपण खरच देशद्रोही होवुन देशाला संकटात आणतो आहोत का? याचा विचार करुन घरात बसुन आणि इतरांना बसवुन देशाला कोरोनाच्या संकटातुन मुक्त करायला सज्ज होवुृया..
..................................................................... संदीप खळे ( पत्रकार) मो. न- 9850390089.