ग्रामीण भागात जादा दराने किराणा मालाची विक्री, नितीन मिंडे यांची कारवाईची मागणी

कोरोना  रोगाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन चा गैरफायदा घेत  ग्रामीण भागातील    काही दुकानदार चढ्या भावाने किराणा मालाची विक्री करत आहेत.पुणे  जिल्हाधिकारी यांनी  किराणा मालाचे दरपत्रक जाहीर करून  नागरिकांना   तक्रारी साठी  हेल्पलाईन उपलब्ध करून  दयावी अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे  पुणे जिल्हा ऊर्जा समिती प्रमुख नितीन मिंडे यांनी  पुणे जिल्हाधिकारी यांना पाठवलेल्या निवेदनात नमूद केले आहे


या बाबत अधिक माहिती देताना नितीन मिंडे म्हणाले की  सध्याच्या लॉक डाऊन चा  फायदा घेत काही किराणा दुकानदार  चढ्या भावाने ,तर काही छापील किमत पेक्षा जास्त भावाने किराणा मालाची विक्री करत आहेत, अश्या प्रकारची अनेक प्रकरणे अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या  कार्यकर्त्यांच्या निदर्शनास  आली आहेत,



तरी शासनाने किराणा दुकानातून विकल्या जाणाऱ्या सर्व  मालाचे अधिकृत दरपत्रक तयार करून ते प्रसिद्ध करावे व त्यापेक्षा जास्त दराने विक्री करणाऱ्या दुकानदारांची नागरिकांना तक्रार करण्यासाठी हेल्पलाईन निमार्ण करावी अशी मागणी नितीन मिंडे यांनी केली आहे. 


लॉकडाऊनच्या काळात रोजगार नसल्याने गरीब  व मोलमजुरी करणारे कामगार जीवन जगण्यासाठी मेटाकुटीला आले आहेत. त्यामध्ये काही किराणा दुकानदार त्यांची लुट करत असल्याची भयावह परिस्थीती आहे. शिवाय वस्तुच्या दराबाबत  किराणा दुकानदारांना  विचारपुस करत ज्यादा दर का?  असे विचारणार्या व्यक्तीला वस्तुच दिली जात नाही. त्यामुळे याबाबत शासनाने लवकरात लवकर दखल घेणे गरजेचे आहे.