युवा उद्योजक अनिकेत खालकर यांनी जपली सामाजिक बांधिलकी..जवळे ता आंबेगाव जि पुणे येथील युवा उद्योजक व गौरी उद्योग समुहाचे संचालक अनिकेत खालकर यांनी पाच हजार कुटुंबाना एक महीना पुरेल एवढे अन्नधान्य वाटप करण्याचा निश्चय केला आहे.त्यानुसार पाच हजार पाकीटांची बांधणी सुरु आहे.
देशावर कोरोनो व्हायरसचे संकट ओढावले आहे. या संकटामध्ये आपल्याकडुनही देशसेवा घडावी या भावनेतुन कोणतेही राजकारण न करता युवा उद्योजक अनिकेत खालकर यांनी पाच हजार गरीब ,गरजु कुटुबांना अन्नधान्य देण्याचा संकल्प केला आहे.
लॉकडाऊन असल्याने गरीब, कामगार मजुरांना उपाशी जीवन जगावे लागत आहे. त्यांना अडचणीच्या काळात सामाजीक बांधीलकी म्हणुन मदत करण्यासाठी युवा उद्योजक अनिकेत खालकर यांनी स्वतांच्या घरी चांगल्या प्रतीचा किराणा आणुन स्वत: कुटुंबासह या अन्नधान्य पाकीटाची पँकीग करत आहेत.
शिवाय याबाबत कोणताही स्वार्थ नसल्याचे उद्योजक अनिकेत खालकर यांनी सांगितले.
अनिकेत खालकर यांनी सामाजिक बांधिलकी जपत गरीब कुटुबांना हातभार लावला आहे. त्याप्रमाणे इतर उद्याेजकांनीही पुढाकार घ्यायला हवा.