मुख्यमंत्री उद्घव ठाकरेंचे सर्व स्तरामधुन कौतुक

कोरोनो व्हायरच शी लढा देताना मुख्यमंत्री घेताहेत योग्य भुमिका.


भारत देशावर आलेले कोरोना व्हायरसचे संकट  रोखण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न केले जात आहेत .  देशातील प्रत्येक राज्यातील मुख्यमंत्री देखील आपापल्या राज्यात कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून झटताना दिसत आहे.या राज्यांच्या मुख्यमंत्र्यामध्ये  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव टाकरे यांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन अर्ध्यातच सोडून देण्यापासून ते कालपरवापर्यंत कोरोनाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न हाणून पाडेपर्यंत मुख्यमंत्री ठाकरे यांनी संयमी आणि संयत भूमिका दाखवली आहे. ठाकरे यांच्या या वेगळ्या छबीची भुरळ देशभरातील राजकारणी, माध्यमकर्मी आणि बॉलिवूडच्या कलाकारांवर देखील पडली आहे. कालपासून ट्विटरवर अनेक लोक ठाकरे यांचे कौतुक करत आहेत.                                


काश्मिरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी तर “उद्धव ठाकरे हे सुखद आश्चर्य ठरले आहेत” असे ट्विट केले आहे.भारताती सर्वात जास्त रुग्ण आणि बळी हे महाराष्ट्रात गेले आहेत. राज्यात आज  ६९० कोरोनाबाधित रुग्ण आहेत. सर्वात जास्त रुग्ण आढळूनही ज्यापद्धतीने कोरोनाला समूहात जाण्यापासून उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रोखले आहे, त्याबाबत अनेकजण स्तुती करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ मार्च रोजी जनता कर्फ्यू लावून कोरोनाविरोधातील लढाई सुरु केली होती. मात्र त्याआधीच ठाकरे यांनी राज्यात १४४ लावून जमावबंदी लावत ठिकठिकाणी परिस्थिती नियंत्रणात आणली होती.


ज्येष्ठ पत्रकार राजदिप सरदेसाई यांनी देखील ठाकरे यांचे कौतुक केले आहे. “ठाकरे हे पहिल्या दिवसापासून कोरोनाविरोधात योग्य तो संदेश देत आहेत. त्यांच्या बोलण्यात कुठेही नाटकीपणा दिसत नाही. शांत आणि संयमपणे ते भूमिका मांडत आहेत. आता त्यांनी फेक न्युजवर प्रहार केला आहे, हे चांगली गोष्ट आहे.” असे ट्विट सरदेसाई यांनी केले आहे. मात्र त्यांच्या ट्विटरवर ट्रोल आर्मींने सरदेसाई आणि मुख्यमंत्री ठाकरे दोघांवरही ट्रोलिंग केले आहे.


बॉलिवूडमधील कलाकार आणि नेहमी स्पष्ट भूमिका घेणारे जावेद अख्तर आणि स्वरा भास्कर यांनी देखील ठाकरे यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत. “महाराष्ट्राने ज्या पद्धतीने कोरोना व्हायरसची परिस्थिती हाताळली आहे, त्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या सरकारचे कौतुक केले पाहीजे”, असे ट्विट जावेद अख्तर यांनी केले आहे.