शिवसेना उपनेते आढळराव पाटील यांच्याकडुन व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे कार्यकर्त्यांशी संवाद.

शिरुर लोकसभा मतदार संघाचा  घेतला आढावा


आज लांडेवाडी, ता. आंबेगाव येथील शिवनेरी निवासस्थानावरून  माजी खासदार शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी  शिरूर लोकसभा मतदार संघातील शिवसेना पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरंसिंगद्वारे संवाद साधून लॉकडाऊन दरम्यानच्या  समस्या समजावून घेतल्या  व त्या सोडवण्याबाबत उपाययोजना यावरही चर्चा केली. 


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  शिरूर लोकसभेतील आंबेगाव, जुन्नर, खेड, शिरूर, हवेली, भोसरी व हडपसर विधानसभा मतदार संघातील पदाधिकाऱ्यांना व्हिडिओ कॉन्फरंसिंगद्वारे चर्चेसाठी   आढळराव पाटील यांनी निमंत्रित केले होते. यावेळी सुमारे ५० पदाधिकाऱीी व लोकप्रतिनिधीनी  चर्चेत सहभाग घेत आपापल्या भागात करत असलेल्या सामाजिक कार्याची माहिती सांगून नागरिकांना उद्भवणाऱ्या समस्या मांडल्या. यावेळी शेतकऱ्यांना शेती कामाच्या व मालवाहतुकीच्या अडचणी, शिवभोजन उपक्रम, रेशनींग मध्ये होणारा  काळाबाजार, गावामध्ये निर्जंतुकीकरण करणे, गावातील गोरगरिबांना जेवण उपलब्ध करुुुन देणे आदी समस्या सोडविण्यासाठी मार्गदर्शन करण्याबरोबरच आवश्यक लक्ष घालणार  असल्याचे आश्वासन आढळराव पाटील यांनी दिले.तर शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून व शिवसेना भवनाकडून येणाऱ्या सूचनांचे तंतोतंत पालन  करण्याचे आवाहनही  आढळराव पाटील यावेळी  शिवसेना पदाधिकाऱ्यांना केले. 


यावेळी झालेल्या चर्चेमध्ये खेडचे माजी आमदार सुरेश गोरे, जिल्हाप्रमुख माउली कटके, महाराष्ट्र राज्य कामगार संघटनेचे अध्यक्ष इरफान सय्यद, माजी जिल्हाप्रमुख राम गावडे,  राजाराम बाणखेले, आंबेगाव तालुकाप्रमुख अरुण गिरे,  जुन्नर तालुकाप्रमुख माउली खंडागळे, खेड  तालुकाप्रमुख रामदास धनवटे, शिरूर  तालुकाप्रमुख सुधीर फराटे, हवेली  तालुकाप्रमुख प्रशांत काळभोर, भोसरी विधानसभाप्रमुख धनंजय आल्हाट, युवासेना विस्तारक सचिन बांगर, जिल्हा परिषद गटनेते देविदास दरेकर  उपजिल्हाप्रमुख निलेश मुटके, अनिल काशीद, पोपट शेलार, सुनील बाणखेले, हडपसर विधानसभेचे समीर तुपे, सचिन तुपे, सहसंपर्कप्रमुख जयश्री पलांडे, बापू शिंदे, शिरूरचे राम गावडे, महिला आघाडीच्या विजयाताई शिंदे, श्रद्धा कदम, जुन्नर उपनगराध्यक्ष दीपेश परदेशी, शिवाजी राजगुरू आदी मान्यवर सहभागी झाले होते. 


लॉकडाऊनच्या काळामध्ये आठवड्यातून किमान दोन वेळा अशा प्रकारे  व्हिडिओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातूम शिरूर लोकसभा मतदार संघातील परिस्थितीवर लक्ष ठेऊन त्या त्या भागातील समस्या कसोशीने सोडविण्यात येईल असे आश्वासन शिवाजीराव आढळराव पाटील  दिलेे.