विघ्नहर साखर कारखान्याने बनविले सँनिटायझर,करणार मोफत वाटप.

 


 


चेरमन सत्यशील शेरकर व संचालक मडंळ कामगारांचे सभासदांकडुन कौतुक.


कोरोनो व्हायरसला रोखण्यासाठी शासकीय पातळीवर जोरदार प्रयत्न सुरु आहेत. जनतेला विविध सोयी सुविधा पुरवण्यासाठी अनेक कपंनी संस्था पुढे आल्या आहेत. पुणे जिल्ह्यातील विघ्नहर सहकारी साखर कारखान्याने अत्यंत कमी कालावधीमध्ये सँनिटायझरचे  उत्पादन सुरु केले आहे. हे उत्पादन कार्यक्षेत्रातील कामगार, प्राथमिक आरोग्य केंद्र  रुग्णालये,  शासकीय कार्यालये, पोलिस, व प्रत्यक्ष काम करणारे कर्मचारी ऊसतोड कर्मचारी यांना मोफत उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहीती चेरमन सत्यशील शेरकर यांनी दिली.     


  पुणे जिल्ह्यातील अग्रेसर असणार्या विघ्नहर सहकारी साखर कारखाना समाजउपयोगी उपक्रमांमुळे नेहमीच चर्चेत असतो. आता कोरोनोच्या संकटाला सामोरे जाताना आपणही कारखाना म्हणुन काही योगदान द्यायला हवे म्हणुन महाराष्ट्र शासनाकडुन परवानगी घेवुन सँनिटायझरचे उत्पादन सुरु केले आहे. अत्यंत कमी कालावधीमध्ये विघ्नहर सहकारी साखर कारखान्याने हा प्रकल्प उभारला आहे.पन्नास मीली पासुन पाच लीटरच्या पँकीगमध्ये हे सँनिटायझर उपलब्ध करुन देण्यात आले आहे.


त्यामध्ये कारखानाच्या कर्मचारी व संचालक मंडळाचे योगदान असुन  सामाजिक बांधीलकीमधुन हा प्रकल्प उभा केला असल्याची माहीती चेरमन सत्यशील शेरकर यांनी दिली आहे.


हा समाज उपयोगी सध्य परिस्थीतीत आवश्यक असाा सँनिटायझर उत्पादन  प्रकल्प सुरु केल्याने विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेरमन सत्यशीर शेरकर,  संचालक , व कामगारांचे सभासदांनी कौतुक केले आहे.