पुणे जिल्ह्यात गरोधर महीलेची हत्या, हत्येपुर्वी बलात्कार झाल्याचा संशय

पुणे जिल्ह्यातील  कांदळी ( ता.जुन्नर) येथे  शेतात गवत कापण्यासाठी गेलेल्या गरोदर महिलेची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. सदर  महिलेचा मृतदेह विवस्र अवस्थेत ऊसाच्या शेतात फेकण्यात आला होता. महिलेची  हत्या करण्यापुर्वी तिच्यावर बलात्कार  करण्यात आला असल्याचा  संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.


याबाबत नारायणगाव पोलिसांनी दिलेली माहीती अशी  कांदळी ता-जुन्नर  येथील उंबरकास शिवारात सोमवारी दुपारी ही घटना घडली. महिला शेतात गवत कापण्यासाठी गेली होती. बराच वेळ झाला तरी ती घरी आली नाही. नंतर तिच्या नातेवाईकांनी तिचा शोध घेतला  असता  उसाच्या शेतात महिलेचा  मृतदेह विवस्र अवस्थेत  आढळून आला आहे.


महिलेच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबलेला होता. महिलेवर बलात्कार करुन तिचा निर्घृण खून करण्यात आला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे. नारायणगाव पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.


22 वर्षीय महिलेला तीन वर्षाची मुलगी असून महीला गरोदर होती. मारेकऱ्यांनी तिची हत्या करण्यापूर्वी तिच्यावर बलात्कार केल्याची चर्चा परिसरात सुरु आहे. या प्रकरणी नारायणगाव पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करत आहेत.*****