पुणे जिल्ह्यातील गर्भवती महीलेच्या हत्येप्रकरणी पतीलाच अटक.


 कांदळी ता जुन्नर येथील विवाहीतेची हत्या   करणार्या आरोपीला नारायणगाव पोलिसांनी अटक केली आहे .या मधील धक्कादायक बाब म्हणजे  चारित्र्याचा संशय घेऊन पत्नीचा खुन करुन  संजय माळी यांनेच हत्या झाल्याचा बनाव केला होता. नारायणगाव पोलिसांनी  तपास करुन आरोपीला आठ तासाच्या आत बेड्या ठोकल्या आहेत.  


   कांदळी येथील  चार महिने गर्भवती असलेल्या आपल्या पत्नीचा  पती संतोष फुलमाळी याने  गळा दाबून खून केल्याची घटना सोमवारी दि. ०६ रोजी दुपारी ३ – ५ या दरम्यान कांदळी ता. जुन्नर येथील उबरकास मळा येथे घडली.


या  प्रकरणी मयत महिलेचे वडील श्याम बापू फुलमाळी यांनी  घटनेची फिर्याद दिली.याबाबत सहाय्यक पोलिस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार मयत विवाहितेचे वडील श्याम माळी हे कांदळी येथील उबरकास मळा येथे वाट्याने शेती करीत आहेत. त्यांच्याच शेजारी त्यांचा जावई संजय फुलमाळी व मुलगी कविता राहत होते. काल दिनांक ६ रोजी दुपारी तीन वाजता मका कापण्यासाठी गेलेली कविता बराच वेळ झाला तरी परत क आली नाही .


याचा शोधाशोध घेतला असता कांदळी येथील विशाल सुदाम कुतळ यांच्या मालकीच्या उसाच्या शेतामध्ये तिचा मृतदेह आढळला. या मृतदेहाजवळ एक चिट्ठी, तंबाखू व चुन्याची पुडी आढळून आली. चिट्ठी लिहिलेला कागद हा संशयित आरोपी कविताचा पती संजय याच्या घरात सापडलेल्या वहीचाच असल्याने पोलिसांचा संशय बळावला होता.


आरोपी संजय याची देहबोली व विचारलेल्या प्रश्नांना दिलेली उलटसुलट उत्तरे यावरून पोलिसांचा संशय अधिकच बळावला मग  पोलिसी खाक्या दाखवताच संजय यांनी खुनाची कबुली दिली.


या घटनेचा पुढील तपास जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी दीपाली खन्ना यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील करीत आहेेेत.