अमरनाथ सेवा संघाचे नागरीकांकडुन आभार.
मंचर ग्रामपंचायत व अमरनाथ सेवा संघ यांनी अत्यावश्यक सेवांसाठी बाहेर पडणारे कर्मचारी, कामगार, अधिकारी पोलिस व नागरीक यांच्यासाठी शिवाजी चौक येथे निर्जतुकीकरण कक्ष(sanitization room ) सुरु करण्यात आला आहे. त्यांचा कामानिमित्त घराबाहेर पडणार्या सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा अशी विनंती मंचर गावचे सरपंच दत्ता गांजाळे यांनी केली आहे.
अमरनाथ सेवा संघाच्या वतीने ही अत्यावश्यक असणारा निर्जंतुकीकरण कक्ष सुरु करुन दिल्यांने अमरनाथ सेवा संघाचे मंचर ग्रामपंचायत, ग्रामस्थ शासकीय कर्मचार्यांनी आभार व्यक्त केले आहेत.
नागरीकांनी घराच्या बाहेर निघणे टाळा. अत्यावश्यक सेवेसाठी गरज असल्यास घराच्या बाहेर पडला तर छत्रपती शिवाजी महाराज चौकात लावलेल्या निर्जंतुकीकरण कक्षात प्रवेश करूनच आपण घरी जावे. तसेच मंचर शहरात घरपोच सेवा देणाऱ्या व्यक्तींनी घरपोच सेवा देताना सदर मालासह आपण या कक्षातूनच प्रवेश करून हा मालं घरपोच करावा. अशी विनंती सरपंच गांजाळे यांनी केली आहे.
मंचर शहरात हा निर्जतुकीकरन कक्ष सुरु केल्याने कर्तव्यावर असलेले पोलिस कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, बँकेचे कर्मचारी सर्व अत्यावश्यक सेवा देणारे दुकानदार यांना या सेवेचा फायदा घेण्यांचीही विनंती सरपंच यांनी केली आहे .
निर्जंतुकीकरण कक्ष आज लोकार्पण करण्यात आला यावेळी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, सरपंच दत्ता गांजाळे,अमरनाथ सेवा संघाचे अध्यक्ष दिलीप महाजन, शेखर चौधरी,अवधुत शेटे, आदी ग्रामस्थ उपस्थित होते.